गझलचा अभ्यास करण्यासठी मला जे काही तुटपुंजं साहित्य मिळाले, तसेच इतरांच्या गझल वाचून तिच्या तंत्राच व नियमांचं माझ्या कुवती प्रमाणे मला जे आकलन झालं त्याला अनुसरून मी ही मात्रा व्रुत्तात गझल लिहिण्याचा प्रयत्ना केला आहे त्यामुळे काही त्रुटी असल्यास माफ करावे, सुधारना व सुचनांचे स्वागतच होईल, हि रचना गझलच्या परिभषेत बसते कि नाही हि शंका असल्यामुळे प्रश्नचिन्ह घातले आहे.
आकाश तारकांचे
काळीज धडधडण्यासाठी श्वास पाहिजे
घेण्यासाठी पण श्वास कुणी खास पाहिजे
फिरतो कुठे एकटाच चंद्र आकाशी ही
प्रेमदुतासही तारकांचा भास पाहिजे
उरले ना भय आता काट्यांचे भुंग्यांना
फुलांनीच तयांचा घेतला घास पाहिजे
इशाऱ्या-इशाऱ्यांचाच कारभार येथला
गारुड्यांचा त्या केला अभ्यास पाहिजे
मिळते कुठे महाली आकाश तारकांचे
नक्षत्र पिण्या झोपडीची मिजास पाहिजे
जुळण्यास धागे हवी कुठे जर रक्ताची
फक्त स्पंदनांत प्रेमाची मिठास पाहिजे
खुळ्या मनाला पडणारी स्वप्नेही खुळी
मनी वास्तव चितारण्याचा ध्यास पाहिजे
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नशिक.