" मरणाची घाई"
जो तो पुढे जाण्याची करीत होता घाई ।
सिग्नल अजून ही पडला नव्हता काही ॥
एक आजोबा काठी टेकत रस्ता ओलांडत होते।
सर्व वाहणं चालक त्यांना दुरून बघत होते ॥
कोणाच्या कपाळावर पडली होती अढी ।
कोणी आपली वाहणे घेत होते पाठी॥
एकदाचा तो सिग्नल पडला !
एकमेकानां सारत जो तो पुढे निघाला ।
या गोंधळात आजोबा गेले गांगरून ।
त्यांच्या हातातील काठी खाली गेली पडून ॥
उचलून देण्या ती काठी कोणा नव्हती सवड ।
पुढे जाण्याची सर्वजण करीत होते धडपड ॥
त्यात एक वाहणं चालक जोराने खेकसला;
अरे! थेरड्या मरायचे का?
म्हातारा त्याला शांतपणे म्हणाला"
नको करू एवढी मिजास !
तू पण कधीतरी " म्हातारा होशील हमखास"२॥
अनंत खोंडे.
५।५।२०१३.