देव तूच प्रेम तूच

आकाश मडक्यात साठवून मी,

सुर्याला चोरण्याचा प्रयत्न करायचो,
मध्यान्हीला आला कि,
सुर्यापासून नजर चोरायचो.
तशी नव्हती दाट मैत्री,
पण नव्हता काही वैरदावा...
कधीमधी बोलायचोही आम्ही,
खास असाही नव्हता दुरावा...
तरीसुद्धा आकाश बनून,
मी सुर्यालाच मागायचो...
पण उन्ह आले कि मात्र मी,
वेड्यासारखंच वागायचो...
दिवस मावळला, रात्र झाली
मी सुर्यालाच आठवायचो...
चंद्राला सुर्य समजून
चंद्रालाच पटवायचो...
स्वतःलाच सुर्य समजून,
स्वतःशीच बोलायचो...
स्वसंवाद म्हणवून,
चायना माल कटवायचो...
किती दिवसांनी पाहिला मी,
सुर्याचा एक कवडसा...
कवळ्या लावून वैद्याकडच्या,
हसलो मी जरासा...
सुर्या तुला आठवतच,
झालो मी जराजीर्ण...
पाने, फुले, फळे लगडूनही,
मी मनातून निष्पर्ण.....
(वृत्तपत्रातील एका कथेवर आधारीत.....)