दृष्टी

दृष्टी 

त्यांची होते कशी वारी
माझी नित्य फिराफिरी
त्यांना होतो तो सोहळा 
इथे गोंधळ सावळा 
निसर्गची त्यांना सखा 
झालो मी का त्या पारखा ?
सूरताल त्यांना साथी 
मला गोंगाट का होती ?
काय करावे कर्मासी 
जशी दृष्टी तशी सृष्टी ...