कामवाली बाय

सदान कदा नजरा तुमच्या कुत्र्यावानी

आजाऱ्यानो, मनान आनला तर 
तुमाला मागू बी देनार न्हाई म्या पानी
दहा घरानची मी भांडी घासतो
माझ्या घरची बी घासतो 
तुझी बायको नुसतीच ऊंडारतो 
काय ऱ्हाते, काय वागते 
काडीच्या कामाची नाय 
तेल्कट थोबरा उगा रंगवते
घरान मेल्याओ नुस्ती घानच घान
माझा घर बघा 
प टकला का नुस्ता समाधान
काय भांडता कचाकचा 
चाटायचा क रं शिक्शान तुमचा
आमच्या घरानचा प्रेम पाहा
नजर बघ ए बाय तुझ्या नवऱ्याची
घाई होली त्येला बघ श्यान घ्यायाची
शिस्तीन वाग म्हनाव, नाहितर कोनी मोली बांधल हारांची 
तुझी पोर बोंबलत फिरतो रातीपर्यंत 
माझी पोरा माझा रस्ता बघतान सारेसहापर्यंत
लंगरा नवरा माझा येतो दारापर्यंत 
पाय गेला त्याचा मधुमेहात
पन आजबी कोनशीबी करेल दोन हात
मोलकरीन झालो कारन नशिबान केला घात 
चोर बोतला तुमी मना
कंचापन काम करू पन चोरी कंदीच ना
पोरगा तुझा कामातून गेला, त्याला शोध ना
नाईलाजान येतो तुमच्या दारी
तुमी नाय ईच्यारला कबा
पन म्या पाजीन तुमाला च्या घोटभर तरी