पुनर्जन्म

पुनर्जन्म

घन अंधार दाटला येथे
सोबतीला उरली भुते

झाडांची सळसळ अन
निशाचरांची वळवळ
सोडून गेली नाती गोती
त्यांना पण वाटली भीती

घेऊन अतृप्ततेची बीजे
अनोळखी माती आली
पिऊन चैतन्य रात्र व्याली
दक्षिण घाटावर पहाट झाली

राजेंद्र देवी