दैव....

दैव...

नियतीच्या कुंचल्याने
जीवन माझे साकारले
नशिबाच्या तराजूने
मोल त्याचे आकारले

कैकवेळा दुःखास मी
स्वतःहून नाकारले
उघडून आनंदाची कुपी
मीच त्यास स्वीकारले

आंधळ्या दैवाने
बंड जेव्हा पुकारले
त्याच दैवास
मी स्वतः झिडकारले

राजेंद्र देवी