मोहन

एक मोहन होता...
तो पाताळी वावरत होता
कृष्णवर्ण उजळवून तो
भले बहाद्दर झाला होता...

एक मोहन इथला...
तो स्वर्गात वावरत आहे
कृष्णधन उजळविणारा हा
न बोलून शहाणा आहे...

एक मोहन होता...
तो लाखोंना कर्षित होता
सत्याचे प्रयोग त्याचे, त्या
फिरंगी घाबरत होता...

एक मोहन आहे, तो
करोडो खेचत आहे
भ्रष्टतेचे प्रयोग त्याचे
पाठीशी फिरंगी त्याच्या...

तो मोहन दास होता
त्या दलित कळवळा होता
हा मोहनही दासच आहे
सारी प्रजा हतबल आहे...

एक मोहन होता, तो
यवनांना कवळित होता
एक मोहन आहे, तोही
म्लेंच्छांना कवळित आहे !!