आजतागायत..........
असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी अपमान सहन केला नाही
असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मी स्वतःला बंधमुक्त मानलं नाही
अशी एकही रात्र गेली नाही जेव्हा मी स्वतःची काळजी केली नाही...
आणि आज.........
मी खऱ्या अर्थाने मुक्त आहे
आजतागायत............
मला एकच गोष्ट मिळालेली नाही
ती म्हणजे माणुसकी......
कधीपासून शोधतेय मी तिला
प्रत्येक माणसात.............
...........आजतागायत