"जीवांची काहिली "
साऱ्यां जीवांची होत आहे काहिली |
राने वने आता ती कुठे राहिली ||धृ||
मंद वाऱ्याची झुळूक नाही |
झुळ झुळ नदीचा नाद नाही ||
पक्षांची किलबिल ना काही |
प्राणी फिरतांना कोठे ना दिसली ||धृ ||१ ||
उंच इमारती उभ्या ठाकल्या |
शेत जमिनी नष्ट जाहल्या ||
नाले विहिरी साऱ्यां बुजल्या |
कुठे आता ती हिरवळ ना उरली ||धृ ||२||
पाण्यासाठी होते वणवण |
एका नदीवर अनेक धरण ||
पाणी देण्याहून होती भांडण |
कोरडी नद्यांची पात्र ही पडली ||धृ ||३||
अनंत खोंडे
१४|५|२०१३.