आस नवचैतन्याची ...
घुसमट तगमग शब्दही झाले नकोनकोसे
आकाश मोकळे अता निरखू दे जराजरासे
येऊ दे जरा तो झुळझुळणारा रेशीमवारा
श्वासात भरू दे रानसुगंध हा घमघमणारा
शीळ कुणा पक्ष्याची येवो अर्ध जरिही
तुटलेली ही तार जुळावी सहज मनीची
मनपक्षी वेडा विहरत जावो दिगंतरासी
कंठात घेऊनी गाणी नवचैतन्याची ....