नाते

नाते...

हे सारे तेव्हाचं ठरले होते
जेव्हा नाते नुरले होते

मी रिता झालो सारे सांगून
तू ठेवले सारे हातचे राखून
हे सारे तेव्हाच ठरले होते
जेव्हा ग्रह आकाशीचे फिरले होते

त्या विश्वात एकटा मी होतो
दिवस जेथे सारे सरले होते
हे सारे आठवणीतच राहिले
ते विश्व तरी आता कोठे उरले होते

मी खूप प्रयत्न केले ते चित्र पुन्हा साकारण्याचे
ते रंग पण आता कोठे उरले होते
हे गीत जरी स्फुरले मज
शब्द त्याचे विरले होते

राजेंद्र देवी