पानी

रस्त्याव पानी सोरताना

आठवा जरा दुस्कालातल्या भावांना
झाराबी सुकली आन होठबी
चाराबी नाय आन पानीबी
बैलांच्या शर्यती लावताव 
त्या बैलाव रास पैसा ओतताव
दुस्कालातल्या जनावराच्या हाराचे सांगारे
कुनीतरी पान्याचा म्हत्व ह्यांना सांगा रे 
खेऱ्यानची एक बाय, तीन हंडे डोस्क्यावर 
आन एक कमरेला
तीन मैलावरशा पानी आनलेला
खालून जमीन तापलेली 
आन वरशा कराक निंबार 
सम्द्या अंगावर सर्दी फ़ुटल्याली 
बाईला ऊमासा आलेला
पन हंड्यानशा एक थेंब पन नाही सांडला
तवऱ्यान एका सापान प पकरला
पायाला मिठी मारून बसला
बाय घाबरली, हललो त ह्यो चावल
तशी हुभी राह्यली
दिर तासानंतर रस्त्याव दोन मानसे आली
त्यांनी तो साप कारला पायानशा
बाय हालली नाय,
मानसांनी हंडे खाली उतरवले
बाय मंगच खाली बसली 
आन बेशुध झाली
आर बाबा,  ती कवाच परली असती 
पन अवऱ्या लांबशा आनलेला पानी
जर फुकाट गेला त 
म्हनून जीव मुठीत झेवून ती हुभी होती
माझ्या मैतरानो, जरा आपन जान ठेवू
पान्याचा थेंब निष्कारनी नका वाया घालवू
सत्यघटनेचा संदर्भः डॉ. अजित गोखले
          पाणीतज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ
आग्री शब्दांचे अर्थः निंबारः ऊन
                            सर्दी फुटणेः घामाच्या धारा
                            ऊमासा: जीव कासावीस (आग्री शब्दः कावुल बावुल)