उमलला मोगरा मंद

उमलला मोगरा मंद ...

उमलला मोगरा मंद, कसा बेधुंद 
वेली पाचूच्या .....
वैशाखी काहिली दूर, करी कापूर
उजळता शुभ्र ज्योतींचा ...
उष्म्याचा होत आघात, रोज आकांत
उसळला पुरता ....
हा भलताची स्वच्छंद, परी निःसंग 
रात्रीतून फुलता ...
माळिती कुणी या शिरी, धरिती का उरी 
तनू शांतवायाला 
ज्योत्स्नेचा सहचर खुळा, अति कोवळा 
भुलवी जगताला ...
ऋतुराजाचा सांगाती, गुंगली मती 
वाहवा किती वानावे ...
घ्या भरुनी ओंजळीतुनी, गंध भरभरुनी
निःशब्दी ते अनुभवावे ....