दुधाळ आई
ज्वार भरलं उरात
किती सोसू मी डागण्या
झिम्म-झिम्माड करीत
ये रे पाउस पाहुण्या
वसणे फिटली हिर्वी
नग्न डोंगर कपारी
ओल्या-वत्सल हातांनी
हिर्वी नेसव शेलारी
नको दान फुका मला
सख्या बरस रे राया
माया वाफाळ दवार
देते अत्तराचा फाया
शुष्क आचळाला माझ्या
देते ढुशी लेकराई
गर्भी ओप तु पियुष
होते मी दुधाळ आई
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.