कशिदा

कशिदा

नाजुक तुझी अदा
मोहविते मना सदा
फुलांनाही वाटतो हेवा
होतात तुझ्यावर फिदा

देता नजरेस नजर
कसा ठेवू ताबा
करेल मन माझे
हरकत हि बेहुदा

ओढुनी रात्र काळी
झोपी मी जातो
स्वप्नांच्या शालीवर काढतो
आठवणींचा कशिदा

राजेंद्र देवी