काय मागावे तुजकडे

काय मागावे तुजकडे  , मला  काही कळत नाही

काय हवे मला याचेच मला ज्ञान नाही

मनात सतत अनामिक हुरहुर , काहितरी मिळविण्याची धडपड

मिळविलेले गमावण्याची भीती अन धडधड

कशासाठी कोणासाठी देह, मन , बुद्धी झिजत आहे

कोण्त्य अगम्य गोष्टी उमजण्यासाठी मी झगडत आहे

प्रत्येक क्षण हातातून सुटून जात असल्याची जाणीव

आणि म्हणुनच प्रत्येक क्षणी काय कमावले अन गमवले यचा मेळ

यालाच म्हणतात की काय जिवनाचा  खेळ

तुझा खेळ मज समजलाच नाही 

जमाखर्चाचा ताळमेळ कधी लागलाच नाही

काय द्यायचे ते दे वा न दे

पण तु सोबत असल्याची जाणीव मात्र सतत दे