चांगली माणसे शोधायची

माणसांच्या भाऊगर्दित ,

 आजपसून मी ठरवलयं चांगली माणसे शोधायची

चांगली माणसे शोधायची म्हणजे वाईट वगळून टाकायची

पण सुरवात कोठून करायची?

चांगले ,वाईट , पाप , पुण्य , योग्य , अयोग्य

कीतीतरी विरोधाभासी शब्द

त्याची परिमाणे कोणी कशी ठरवायची ?

स्वताःच्या संदर्भानुसर का त्याची व्याख्या बदलायची ?

 आजपसून मी ठरवलयं चांगली माणसे शोधायची

अवती-भवती शोधू लागले

एकाच व्यक्तिरेखेला वेगवेगळ्या संदर्भानुसार मापू लागले

आणि मज उमगले , चांगले ,वाईट असं काही नाही

जे दिसतं ते तसं असेलच असे नाही

प्रत्येकाने आपापल्या सोईनुसार केलेल्या या व्याख्या

त्याची विश्लेषण समजण्याची मुळी कोणाला गरजच नाही

  माणसं ही फक्त माणसं असतात

त्यात चांगल्या आणि वाईट व्रुत्ती लहरतात

अन त्या त्या वेळी ती देव , दानव , मानव असतात