मातीमोल (कविता)

  मातीमोल

आई तुझ्या लेकरांची
कशी हरवली भ्रांती
जड झालं जीवाभारी
म्हणून विकती शेती
आसमानी-सुलतानी
मोठा विळखा जबर
त्यात तुझ्या नापिकीनं
पडली मोठीच भर
तुझ्या नापिकीला माये
आहो आम्हीच कारण
खता-पिकांच्या मारानं
तुझं लुटलं नहाण
विकतांना तुला आये
वाटे शेतकऱ्या द्यावी
कसे पोचतील हात
तोच गातोया भैरवी
धन-दांडगा एखादा
पाडी मग जीवा भूल
देतो मोल भारंभार
होते 'माय' मातीमोल
                                  -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                    मु. जळगांव, ता. निफाड, जि. नशिक.