असा ही वसंत
नमून पळसाच्या कळसा
घालून पिंपळाला वळसा -
पळता पळात सरली वाट
आला झुळ--झुळ नदीचा काठ -
वटाच्या जटा खेळ सुरपारंब्यांचा
वास तेथे गोड रसाळ आंब्यांचा -
अशोकाने हात टेकले आभाळा
गवताने हात मारले कपाळा -
घातल्या अमलताशाने पिवळ्या माळा
लागला गुलमोहोराचा लळा -
डांगर मळ्याची हिरवळ, लपली हरळ
वांगड डोईची शिरवाळ, गेली मरळ -
टिटवीचा गजर---कोकिळेचे हाक
वसंताची नजर --- सरला शिशिराचा धाक -