पाखरं भेदरली जिवघेण्या उन्हानं
कधी भरलं आभाळं धरणीच्या घामानं
झाली सांजवेळ पाखरं विसावली
करूण नजर गगनी फिरकली
एक आशेची लकीर नभोदरी झळकली
मेघ काळे-सावळे जणू खेळाया जमले
वाऱ्याच्या संगे हसू-खळू लागले
आवाजाचा गलका हळु हळु वाढला
क्षणार्धात हास्याचा चौघडा झडला
तहानलेली धरती जणू साद घाली पील्लाला
तसा थेंबं धावोनिया बिलगला मातीला
पहिल्या मिलनाचा आनंद वर्षू लगला-लागला
आता फुलेल अंकूर निजलेल्या बिजाला