पावसाची मिठी

पावसाची मिठी

भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रीती
तुडवितो राने 
करी चोळामोळा
धावे सैरावैरा 
कसा याचा चाळा 
थेंब किती भारी 
सरीवर सरी 
करी शिरजोरी
लगटतो उरी
पावसाची मिठी 
ओलावली दिठी 
किती दिसा जाली
सजणाची मिठी
उणावे आवेग 
पुरेपूर संग 
उन्हात हसूनी
निहाळी निःसंग 
लाजली धरणी 
मुख घे झाकोनी 
हासू झळकले 
पदरा आडोनी ....