ठाव

काही मनात असेल ते बोलायचे

आता मुळी ना मागे हटायचे

नातेसंबंध जपता-जपता

किती स्वतःला विसरायचे?

स्नुषा कधी , कधी पत्नी

कन्या कधी तर कधी भगीनी

किती नाती बांधण्या धडपडायचे

आणि स्वतःला हरवून बसायचे

मी मात्र सर्वांची आणि कोणती माणसं माझी ?

सोईस्कररीत्या दोन्ही घरांनी माझे हक्क नाकारायचे

सर्वांचे प्रश्न मी सोडवायचे

अन माझे प्रश्न पण न मला कळायचे

काही मनात असेल ते बोलायचे

आता मुळी ना मागे हटायचे

शोध घेण्या स्वतःचा डोकावले मी अंतरी

कोपऱ्यात शांत तेवणारी समई तीच का ती मी?

आदीमाया , आदीशक्ती अनेक नावे तीची त्रिभुवनी

तिचाच अंश घेऊनी जन्मले या प्रांगणी

स्वयंभू मी संपन्न मी मला न कोणाची भीती

संसार-रथातील मह्त्वपूर्ण सारथी , तीच  ती मी