मनं

मनं रवाळ - रवाळ गाईच्या तुपागत ,

मनं मधाळ - मधाळ फुलातल्या मधागत ,

मनं होते फुलपाखरू सुधा-सुख टिपत - टिपत ,

मनं आहे तरी कसं ,

        कोणी सांगेल का शब्दांत ?

मनं जाई भूतकाळी , मनं जाई भविष्यात

वेध भविष्याचा घेई असूनही अज्ञानात

कधी पुढं जात , कधी मागे वळीत

मनं अडकलं वर्तमानाच्या जालात

मनं आठवणींची कुपी ,

   काय शोधी गतकाळात ?

मनां ठेवी जरा भानं ,

     जाईल निसटून आत्ताचाहा क्षणं

पुन्हा येईल फ़िरून होऊनीया आठवणं