मनं भाग-२

मनं पाखरू - पाखरू गेलं गगनाच्याही वरू

मनं पिसाट - पिसाट धावे जणू वेडे वारू

मनं उचंबळे कधी सागराच्या लाटेगत

क्ष्णार्धात घेते उडी खोल अद्बभूत दरीत

कधी आनंद वनात, कधी दुःखाच्या खाईत

खेळी सुर-पारंब्या कधी वनात फुलत

वाटे मनं भरलं-भरलं , रिक्त होतं क्षणातं

 भेदरतं कधी मनं  पडत्या पर्णला

कधी घाली गवसणी त्रिभुवनाला

जे न कधी घडे सत्यात- स्वप्नात

कल्पाना असंख्य दडल्या तयात

मनाची कवाडे जेव्हा मोकळी होतात

अर्थ शब्दांना लाभून कविता फुलतात

मनं  उमजलं वाटे , निसटलं क्षणात

मावेला का कधी माझ्या दोन्ही करांत ?

खेळ खेळी सदा जागेपणी अन् नीद्रेत

 वाट करी  मोकळी  स्वप्नांच्या जगात

मनाचा ठाव कोणा कधी का लागला?

घातलेले जणू कोडे आखिल मानवाला.