आयुष्याच्या साजवेळी , सावलीही लांब झाली
कोणीतरी मागं राहील्याची जाणीव मात्र तिव्र झाली
थोडं थांबून , मागे वळलो ..... कोणाची तरी चाहुल लागली
आठवांचे पटलं झरझरले.... घटनाक्रम पलटले
जिवनच्या शर्यतित तीची आठवण धुसर झाली
मंद संध्याप्रकाशात , तीची छबी स्पष्ट दिसली
कोणीतरी मागं राहील्याची जाणीव मात्र तिव्र झाली
कॉलेजच्या कट्ट्यावरील तिची एक-एक भेट आठविली....
नव्हतोच बोललो कधी तिच्याशी ,
नुसतीच देवाण-घेवाण नजरेची.....
अनेक प्रश्न तिने विचारिले अनं मी दिलेली खरी उत्तरे .....
शब्दाविन आमुचे कधी न अडले ......
वाटले त्यादिनी ती थांबवेलं .... अनं बोलेल काहीतरी
क्षणभर घुटमळलो .... फिरूनी पुन्हा मगे वळलो .....
क्षीणं ... मंद... ती हसली...
हृदया चटका लावून गेली .......
अनं भेट ती अखेरचीच ठरली ......
सर्वस्व हरवल्याची जाणीव तिव्र झाली