विरह

ती म्हणली " पंचाहत्तरी करायची .... "

मी म्हणालो " गरजचं काय त्याची ...? "

मी मुळचाच हटवादी...

यावेळी हट्टाला तीही पेटली...

म्हणाली ... "हौस-मौज काही नाही मुळी"

नेहमीचीच तक्रार तीने मांडली....

दाढी वाढ्वून... अबोला मी धरला...

नटून-थटून  तीनं... आपली हौस पुरवली

लेक-सुना ... मुलां-नातवंडात .... मीरवली 

नथ-नऊवारीतली ती ... माझ्या मनाला भावली...

समाधानी मुद्रनें ती फोटोफ्रेम मध्ये वीसावली

चार दशकांचा बंध .... पुढे चारच महीने राहीला.

की जायचंय हे आधीच कळलं होते तुला ?

एकाट्याला सोडून ...  गेलीस कशी समर्पणाला

 विचार माझा एकदाही नाही का  शिवला तुला ?

रोज दाढी करतो... परीटघडीचे कपडे घालतो ...

तुझ्या आठवणींवर दिवसं काढतो ...

फोटोतल्या तिच्या   नजरेत स्वतःला शोधतो ........