बालपणीचे सवंगडी , बनले माझे प्रतिस्पर्धी,
कोणते हे मुखवटे घालून ... धावतो या शर्यती...
जगलो शब्दाखातीर ज्यांच्या ... ते न शब्दां जागले,
ओवाळीला जिव जयांवर ... गळे त्यांनीच कापिले ,
विरुद्ध ठाकले माझ्या ... माझेच रक्तबांधवं ...
कलीयुगात अजुनी किती घडणार महाभारतें ... ?
बरेच वेळा... पुढे जाऊन ... प्रश्न परक्याचेही स्विकारीले
अर्थाचे अनर्थ होऊनी , त्यांनी मला धुत्कारले ....
माहीती असूनी ऊत्तरे... पुढे अनेक प्रश्न मी नाकारले ...
काय करू मी ... अनुभवांनीच का मज असे घडविले ?
मात्र आता ठरविले ... जगणें दुसऱ्ञांचे ना जगायचे ....
रिक्त हस्ते जन्मलो ; तरी रिक्त हस्ते न जायचे ....
काटें दिले कोणी कितीही .... नंदनवन फुलवायचे ....