श्रीगणेशा
केली नोकरी वर्षे बत्तीस
आज आलो निवृत्तीस
अजून माझ्यात उमेद आहे
पण निवृत्त होणे रीत आहे
देऊन भरजरी शाल
केलात सन्मान बहाल
अनुभवांच्या शिदोरीवर
करेन उर्वरित वाटचाल
वाढवून निवृत्तीचे हे श्रीफल
करेन पुन्हा श्रीगणेशा
असेच सखे सोबती भेटावे
हेच मागणे आकाशा
राजेंद्र देवी
(आमचे मित्र श्री चंद्र्कांत मराठे तसेच निवृत्त होणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण)