आ - र - ती
(आ) आदित्य उदय झाला, आनंदे दिला साज
(र ) रविकिरणांनी रजतपटला रक्तिम रंगावे आज
(ती) ती उषा सस्मित स्वागता सज्ज, सोडून काज
(आ) आकाशी दृष्टी एकटक, सलज्ज, स्तंभित
(र ) रहस्य न उमजे, गेले कसे रजनी-रजनीनाथ
(ती) तीळ-तीळ तुटे काळीज, तिने न देखिले मम नथ
(आ) आकांक्शा मनीची कशी करू पूर्ण
(र ) रथारूढ होऊन शोधते व्योम संपूर्ण
(ती) तीव्र वेगाने धावूनही इच्छा आहे अपूर्ण
(आ) आरास बदलती नाचून तारे
(र ) रचती डोलारे, हलविती वारे
(ती) तीरावर अजून ती पाही वाट रे ......
विजया केळकर __