हिर्वाई
सुक्या-सुक्या रानामधी
आला पाऊस पाहुणा
झाली माती न्हाती-धुती
तिनं घेतला उखाणा
बिज अंकुरलं कुशी
आल्या धरतीला वेणा
आल्या उगवून वर
पाती कवळ्या सगुणा
काळ्या काळ्या धरतीनं
हिर्वा शालू पांघरला
हिर्वाहिर्वाकंच रंग
रे आभाळानं पाहिला
हिर्व्या - हिर्व्या हिर्वाईनं
चेव आभाळाला आला
हिर्वा होउन सजन
पुन्हा पुन्हा बरसला...!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५ )
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.