सुगंध उडोनिया गेला कधीचा ......

लावोन मलमं  , जखमां दिल्यास अनेकं ....

एकदा तरी का तक्रार मी केलीं ,

टाकोन पाश , केलं जायबंदी ......

तोडण्याच्या यत्ना कधी का  मी केला ,

कळ्या मोगऱ्ञाच्या माळल्या अनेकं ....

नाकारला कधी  का गंध त्याचा,

उधळलेस सप्तरंग चौफेर मझ्या .....

जायबंदी मी काळ्या रंगात कालच्या,

राहतो सदैवं तुझ्या अवती-भवती ....

मनं घाली रुंजी कोणा भवती ,

व्यर्थ प्रयत्न जपण्या आठवांचा ....

सुगंध उडोनिया गेला कधीचा,

निष्प्राण , निर्माल्य उरले का हाती ....

नको भ्रांत , नको खंत .. निसटल्या व्यथेची...