कोट
पाऊस आला सर-सर
घाला रेनकोट भरभर
पाणी वाहिलं झरझर
अंग नाही ओलं कणभर
काय वाजतय? थंडी
दाराला लावा कडी
उघडा ओव्हरकोटची घदी
पाण्याची बनली बर्फाची वडी
रखरखीत ऊन आले धावून
निघा सनकोट घालून
बर्फ ठेवलाय ना सांभाळून?
कि गेला वितळून?
कि उडला वाफ बनून?
विजया केळकर__