पत्ता

एकंदरीत आपल्या देशातच पत्ता हुडकणे आणि सांगणे ही देखील एक कला आहे. पहिल्या झटक्यात तुम्ही पोचलात (पोचलात म्हणजे बरोबरजागेवर जिथे तुम्हाला जायचे आहे तिथे) तर स्वतःला तुम्ही पट्टीचा हुशार समजाव. परवाचीच गोष्ट आहे, मला आमच्या एका परिचितानं कडेजायचं होते. पत्ता नीट माहीत असावा म्हणून मी त्यांना फोन केला तो त्यांच्या सौंनी – म्हणजे जोशी काकूंनी उचलला.
मी - उत्सुकतेने विचारले चिंतामणी हाउसिंग सोसायटी प्रतीक नगर जवळ पौंड रोड कोथरूड हाच पत्ता बरोबर आहे का? जरा मला डाइरेक्षनमिळतील का ? ..त्यावर त्यांनी मला उत्तर दिला ते असे…
काकू - हे बघ पत्ता फार सोपा आहे  लक्ष्यात ठेवायला… पहिल्यांदा तू पौंड रोड वर ये… पाच मिनिटा नंतर एक वधू वर सूचक मंडळ लागेल…डाव्या बाजूला… तिथे तू विचार की आनंद नगर ला कसे जायचे… कोणी ही सांगेल.. मग आनंद नगर च्या पुढे एक पेट्रोल पंप आहे… एचपी  का बीपी यांचा.. नक्की माहीत नाही थांब…(अहो… अहो… ) काकू थोड्या वेळानं आल्या आणि म्हणाल्या पेट्रोल पंप विसर…बंद झालाम्हणे…उजव्या बाजूने बघत येशील तर मारुतीचे एक मंदिर लागेल… शनिवारी भरपूर गर्दी असते तिथे… तिथून डाव्या बाजूला गल्लीत वळशीलतर देशपांडे राहतात…
मी - कोण देशपांडे…
काकू  -  अरे त्यांचा मुलगा नाही का मागे ऑस्ट्रेलियात गेला होता… आयटी मध्ये होता
मी - आठवण झाल्यासारखे खोटे दाखवत आणि मूळ मुद्या वर काकूंना वळवत…हो हो हो…बरं मग पुढे कसे जायचं?
काकू  -  हम… मग बघ तिथून  थोडा पुढे आलास की डाव्या बाजूला एक गुलमोहराचे झाड आहे आणि एक गल्ली आहे
मी  - तिथून आत वळायचे का?
काकू  -  अरे जरा मला बोलू देशील तर…नाही तिथे जाऊन पोचशील… उजव्या बाजूला जी गल्ली आहे तिथे एक विजेचा खांब आहे…तिथेचकोणालाही विचार चिंतामणी सोसायटी कुठे म्हणून कोणी ही सांगेल.
हे मनात ठेवून चिंतामणी चे स्मरण करत मी सोसायटी हुडकायला निघालो.
जवळ च्या जवळ देखील  मला एक रिटायर्ड कर्नल नि असा पत्ता सांगितला यू गो स्ट्रेट…देन टर्न राइट…देन टर्न लेफ्ट…अगेन टर्न राइट…देनअगेन टर्न राइट… ऑर माईट बी लेफ्ट.. नो राइट इज करेक्ट देन गो स्ट्रेट…अँड सी टू युवर राइट देर यू आर … ऑलराइट ..
अतिशोक्ती नाहीतर माझ्या एका हुशार मित्राने मला असा पत्ता एस.एम.एस नि कळवला होता की काखेत कळसा आणि गावाला वळसा याम्हणीचा अर्थ मला नावीन्याने समजला होता. तो कुठे म्हणे वाकड अशा ठिकाणी राहतो… त्याच्या घरी पोचल्यावर मी त्याच्याशी वाकड्यातचशिरलो.. त्यांनी ऑफ डांगे चौक च्या‍ पुढे तिसरया वळणावर दुसरा डिवाइडर कट आणि पहिल्या गती रोधकानंतर वळ्ण्याचा आदेश लिहूनपाठवला होता.
लहान पणी मी पत्त्यांचे बंगले उभे करायचो, आज काल सेलस च्या कामा मुळे मला बंगल्याचे पत्ते हुडकावे लागतात. तसा खूप फिरलो आहे मीशहरात पण आता इतक्या उंच उंच इमारती झाल्या आहेत की कधी काळी मित्र असलेला रस्ता देखील अनोळख्या सारखा मझयाकडे पाहतो.कदाचित मी मराठी आहे हे लवकर त्याच्या लक्षात येत नसले पाहिजे.
पत्ते हुडकताना रिक्षवाले पानवाले इतर धंदे म्हणजे बिझनेस करणाऱ्या लोकांचा आज काल जरा कमी उपयोग होताना दिसतो आहे. कंटाळलेलेआहेत बिचारे. पानवाल्यांचे मी समजू शकतो त्यांना चुना लावायची सवयच असते पण इतर लोक देखील आज काल जरा बिझी झाल्या सारखेदिसतात.  परिस्थिती तशी फारशी बिकट आहे असे ही नाही… मिळतो शेवटी तुम्हाला पत्ता आणि शोधण्याचा समाधान पण. नाहीतर उशीरझाला कुठे जाण्यास तर आपण बिनधास्त पणे फेकतो… पत्ता सापडला नाही हो!!!. खूप हुडकवा लागला…मी इथे नवीनच आलो आहे.