आस मुक्तीची

स्वातंत्र्य गमविले मी

पिंजऱ्यात अडकलो मी 
अलबेल सर्व असुनी 
एकटाच कळवळे मी
रंग आकाशिचे हरवले
स्वपातही न जंगले
पावसात चिंब भिजणे 
नुसतेच ते आठवणे
वाऱ्यात ताल धरणे
वादळात घट्ट मिटणे
पंखांत चोच खुपसुनी
मायेची ऊब घेणे
करतोस तू विहार
दिसते तुला शिवार 
सोनेरी गोड दाणे
उडत खात जाणे 
घेऊनी ये जनांसी 
ज्यांना असे जराशी
ही लाज बंधनाची
अन दया जरी फुकाची
पणास लाव शक्ती
मज बंधमुक्त करण्या
तोडी पिंजरा लवकरी
बाहेर भेटू उराउरी