---- निसर्ग छटा - - - -
खारा वारा झोंबतो नारळी पोफळीत
नभीचा चंद्र लपतो झावळीत
वल्हे घेऊन निघतो नावाडी
ललकारी देऊन येतो सवंगडी
कडेकडेने लव्हाळी शेवाळी
रवी किरणाने आली झळाळी
गोल बिंब क्षितीजावरी
खळखळ सूर-लहरी सागरी
लेणी रेखिली पश्चिमी
केतकीचा दरवळ केताकीवर्ण पर्णाचा गाभा
लगडली कदली,लपली स्थूल काय रंभा
करदळी पिवळी विहिरीपाशी अन चाफा
रमणी वर या हरित पीत आभा
पालखी दिनमणीची गेली दूरवरी
लंबे झाले चारी भोई भुईवरी
देई दिलासा दशाश्व अम्बरावारी ___
विजया केळकर __