होतील त्यांचीही फुलें....

चाललिस एकाटी  धुक्यातुनी , कोणत्या अनामिक वाटेवरी,

थोड्याच सोबतिचा  म्हणोनी तरी , हात हाती घेऊ दे,

झेलण्याचे दुखः एकटीने , घेतलीस का शपथ ती,

शिडकाव आश्रुंचा मजवरी , एकवार तरी होवू दे,

घट्ट मिटल्या ओठात , कोंडले कीती शब्द हे,

मोकळी कर वाट त्यांची, वीसावा  त्या लाभू दे,

टाक तु झोळीत माझ्या, दुखः चिंता क्लेश हे,

चांदणे शिंपीन मी,  होतील त्यांचीही फुलें ....