मुखवटे...

रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे

थांग लागेच ना मन किती गहिरे

द्वेष माडापरी,  प्रेम झाले थिटे

चेहऱ्यावर इथे मुखवटे... मुखवटे.

पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे

सभ्य वेषात या नांदती चोर हे

दान देण्या निघे अन जगाला लुटे

चेहऱ्यावर इथे मुखवटे... मुखवटे.

शब्द फुलापरी मनी निखारा जळे

वेष संतापरी हृदयी विषारी तळे

लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे

चेहऱ्यावर इथे मुखवटे... मुखवटे.