वितभर पोटासाठी

डोंबाऱ्ञाचं पोरं फिरातयं हाती घेऊन वाटी,

आई हाती ढोलं , आसूड बापाच्या पाठी,

कशासाठी, कोणासठी  वितभर पोटासाठी .....

चाललायं हा खेळं तुझ्यासाठी का माझ्यासाठी ,

रितं पोट खपाटी..., डोईवर दगडाची पाटी ,

स्वयं-रोजगाराच्य नावे , भरल्या कोणा घरी पोती .....

तरी बरं तु पोट... दिलय प्रत्येकासाठी ....

कदाचीत भूक म्हणजे काय हे कळण्यासाठी....

भरली ज्यांची पोटं, डकारर्ही ना त्या ओठीं ,

जमवत आहे माया , पुढल्या सातपीढ्यांसाठी ...

श्राद्ध तरी भविष्यात  , घालतील काय ह्या त्यांच्या साठी....

न्यारा तुझा नियमं , दिलं सर्वां पाठी-पोटीं ...

चोच दीली जशी ... दाणाही दे सर्वांसाठी .......