शनी
प्रत्येक नदी ईथली ही
गंगाच आहे
मात्र पावसाने दाखविला
त्यांना ईंगा आहे
तसं तर अजुनही
काळजात आभाळाच्या
ओलावा आहे
फक्त भगिरथांचीच
काय ती ईथे
वाणवा आहे
रथी-महारथींच्या
पावन पदस्पर्शाने
झाले पुनीत
ईथले पठार आहे
आतच का ?
झाली वांझ
सह्याद्रीची ती
कपार आहे
सुका कधी, कधी ओला दुष्काळ
आता नित्याचेच
हे चक्र आहे
का ? आम्हीच तो 'शनी'
झाला निसर्गावरती
वक्र आहे...!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.