झाला वेडा पिसा ......
कां न मिळाले भूदान?
इतका ठरला नादान
आवाज निघाला जरासा
तो नव्हता पुरेसा _____
झाला वेडा पिसा ......
कां न मिळाले कदान्न दान ?
रिकामेच राहिले पान
एक होता पैसा
रिता झाला फाटका खिसा _____
झाला वेडा पिसा ......
कां न मिळाले गोदान ?
रंग गोरापान,अज्ञात खानदान
कोठून मिळावा दिलासा
व्याकुळला दोन-चार घासा ____
झाला वेडा पिसा ......
कां न मिळाले वरदान?
मग फेकले दान
उलटा पडला फासा
सोडे खिन्न उसासा ____
झाला वेडा पिसा .....
कां न मिळाले करण्या रक्तदान ?
अकल्पित सामोरे रोग-निदान
कां न थांबलास श्वासा ?
अचानक हसत म्हणे हसाऱ्हसा ____
झाला वेडा पिसा ......
झाला वेडा पिसा ........
विजया केळकर ___