श्रावणमास

श्रावणमास

तुझ्या नितळ कांतीवर
झळकते कोवळे श्रावणऊन
ओठातून हळूच निसटते
हलकिसी धून

वाऱ्याच्या तालावर
झुलतसे तुझा केशसंभार
जणू अवखळ नदीला आला
श्रावणबहर

मिटतेस जेव्हा डोळे
झाकोळून जाते आकाश
जीवन माझे झाले जणू
आठवणीचा श्रावणमास

राजेंद्र देवी