झरझर झरल्या श्रावणसरी...
तरतरल्या,बह्ररल्या तरु-वेली,
ल्याली वसुधा शेला मलमली ,
चुडा हिरवा, इंद्रधनू भाळी ....
नववधू प्रिया परी तेजाळली
झरझर झरल्या श्रावणसरी...
फुलवला पिसारां मोरांनी ,
मदमस्त धरेच्या गंधानी ....
चिमुकली फुलेही खिलखिलली....
रंगीत पाखरं भिरभिरली ...
हिरव्या-पिवळ्या शेजेवरी.....
क्षणं काही विसावली.....
झरझर झरल्या श्रावणसरी...
देखणं रुप नव-नवतीचं ...
सोहळा पाहुनी मनं भुललं...
आलं उधाण अखंड तृप्तिचं ...
जागेपणी दर्शन परमात्म्याचं........