तुम्ही आलात की...
तुम्ही आलात की पाऊस पडत असतो
मातीला सुगंधी गारवा मिळत असतो
थोडे हातपाय पसरून आम्ही रिलॅक्स होतो
तुमचा आधारच तसा भरभक्कम असतो
तुन्ही आलात की आभाळ ओथंबलेलं असतं
भर दुपारी सूर्यही ऊन झाकत असतो
वाऱ्याला सुखद लडी लगडलेल्या असतात
जडावल्या पापण्यात आम्ही थोडं रेंगाळत असतो
तुमचा ममतेचा झराच तसा भरून वहत असतो
तुन्ही आलात की सगळं कसं भारावून जातं
माळरान हसतं डोंगरही मोहरतो
काटेही माना टाकत असतात
तुमच्या पाऊल स्पर्शासाठी रस्ता आसुसतो
तुमच्या असण्याने आम्ही निर्भय होतो
तुन्ही आलात की आरस्पानी आठवांचे सर लखलखतात
आणि वाफाळलेला चहा अन भजी चाखण्यात आम्ही रमतो
बिघडलेल्या पोटावर उतारा तुमचाच असतो
तुमच्या चयतन्याने आम्ही सळसळत असतो
नभ निळाईपे थेंबाथेंबात सुखवितो
तुम्ही आलात की पाऊस पडत असतो
तुम्ही आलात की पाऊस पडत असतो