आषाढ विरहिणी ...

आषाढ विरहिणी 

आषाढसरी कोसळती बेफाम डोंगरावरती 
लख्खशी कोरडी झाडे पानातून अश्रू झरती
ते उनाड पक्षी लपती अश्रूंना घेऊन पोटी 
पाण्यातून वाहत गेल्या त्या गंधफुलांच्या वाती 
अर्थाविण येणे सुकणे अश्रूंचे वहात जाणे 
वाऱ्यावर विरून जाते चिंबसे गीत विराणे ....