वेदने जेंव्हा तुझे

वेदने  जेंव्हा तुझे माझे जुळाया लागले

दुःख हे  तेंव्हा मला अपुले म्हणाया लागले

मी  जरा चर्चेत आलो माझिया लोकांमधे
होवुनी  बदनाम माझे नाव व्हाया लागले

कोण हल्ली  वाचतो अन ऐकतो आहे मला
शब्द माझे  कोणत्या गुर्मीत जाया लागले

ऐवढे  सांभाळुनी मी ठेवले होते तिला
आसवांचे  लोचनी नातेतुटाया लागले