मी जरी

खर्च केले मी जरी

माझेच नाणे
आज येथे स्वस्त नाही 
प्रेम गाणे 
मी जरी तुला दिले 
माझेच पंख
तू अशी उडण्यास नसशी 
का समर्थ ?
मीच माझी स्वप्न सारी 
उघडून ठेवली 
ती आता पाहून घे ना 
एकदा तरी 
नाही पटले तुला जरी
त्यातील वास्तव
नको जगू कल्पनेत खोट्या 
पाहुनी असत्य