दिवाळी अंकासाठी आवाहन

प्रिय मनोगतीनो,

आपल्याला माहीत आहेच की गेली सहा वर्षे, म्हणजे २००७ पासून आपण मनोगताचा दिवाळी अंक सातत्याने काढत आहोत.  ही
परंपरा खंडित न होता तो या वर्षीही (व यापुढेही) निघावा अशीच  आपणा सार्‍या मनोगतींची इच्छा असणार. गेल्या वर्षी अंकाची जबाबदारी आम्ही घेतली होती व ती पारही पाडली होती.   परंतु आपापल्या वैयक्तिक कारणांमुळे व/वा व्यावसायिक व्यग्रतेमुळे आम्हाला यंदाच्या अंकाचे काम करणे शक्य नाही.  आमची खात्री आहे की मनोगतींपैकी काही जण हे काम करण्यास सक्षम, तयार, एवढेच नव्हे तर उत्सुकही असतील. तरी आपल्यापैकी काही जणांनी पुढे ये‌ऊन हे काम करावे आणि इतकी वर्षे चालू असलेल्या ह्या उपक्रमात खंड पडू दे‌ऊ नये अशी कळकळीची विनंती आम्ही करीत आहोत.

नवीन समितीस आमच्या सर्व शुभेच्छा.

अंकसमिती
दिवाळी मनोगत २०१२