नका सांगू मजला , पुरणातल्या कथा
भुलले तपोऋषीही , जिथे मेनकांना ...
नका दावू दाखले , धर्म राजाचे नेक
पांचलीही पणाला , दुर्योधन अनेक...
पिडीत ललना का फक्त कलियुगी ,
रघुवंशी पडली सिताही अग्निकाश्ठी...
चिरंजीव अश्वश्थ म्हणतात सारे ,
मागतो तेल अजून दारोदारे ....
कपट, कारस्थाने चालली कधीची ,
मर्यादा ना त्या कोणत्याही युगाची ....
निर्भेळ,शुद्ध अंतकरणे कितींची ,
घ्यावी लागेल सवय ... असे जग्ण्याची ................