तुझी साथ

पूर्ण पाच तपांचा तुझा तो सहवास
कधी नव्हे तो बेरजेला मी आज
तीच माझी तू आणि तोच तुझा मी
शब्दही तुझा ना स्पर्शे आता मज
 
तुझपाशी केली जीवनाची नवी सुरूवात
वेचले ते सगळे क्षण तुझ्याच समवेत
उपमा मोतीयांची देऊ कशाला तयासि
पत्थराहि लाजवे मोल दिसे माझ्या नजरेत
 
घडल्या बर्‍याच घडामोडी सरला हळू हळू काळ
टिकला त्यात आणि बहराला तो संसाराचा वृक्ष
त्याचा तो मी बुंधा वाटे वरुनी आधार
पण घट्ट मुळे बनुनि राहीलिस तू सदैव दक्ष
 
खरे सांगतो मी कळे तसेहि तुजला
रिकाम्याच तुझ्या ईच्छा जाणील्या मी उशिरा
टिपटिपती डोळे माझे ना धुते तरीही
मनी रोष हा माझा अस्वस्थ जीवी करी सारा
 
निपचित पडले शरीर तुझे आज 
साधा श्वासही तई ना निघे आता
ओल दाटली डोळ्याशी काया गेली थिजुन 
सोडूनि गेलीस मजला झालो मी पूर्ण रिता
 
ओसाडी मना हा मी समोर आता भिक्षुक उभा
मागणे माझे समोर ठेव त्या कोटी ईश्वरासी
जुळे बंध पुन्हा तुजशीच पुढील जन्मी
हवी तीच साथ तुझी ती मलम रेशमासी